MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?
Uddhav-Raj Thackeray Alliancesaam tv

MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?

Uddhav-Raj Thackeray Alliance: मनसे-शिवसेना युतीची घोषणा आज होणार आहे. ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार आहेत. त्याचवेळी ते जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करतील. कोणत्या पक्षाला किती जागा देणार याची माहिती समोर आली आहे.
Published on

Summary:

  • ठाकरे बंधू आज अधिकृतपणे मनसे–शिवसेना युतीची घोषणा करणार

  • महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा ठाकरे बंधूंचा निर्णय

  • जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित

  • ब्ल्यू सी हॉटेलमध्ये होणार पत्रकार परिषद

गिरीष कांबळे, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर तो दिवस आज आला. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीसोबतच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात देखील चर्चा झाली. दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय ठाकरे बंधुंनी घेतला आहे. त्यासाठी ते आज दुपारी १२ वाजता युतीची घोषणा करणार आहे. युतीची घोषणा करण्यापूर्वी दोघेही दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत ते युतीची घोषणा करतील आणि जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?
MNS News: मनसेने भाकरी फिरवली; कल्याण शहर अध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची वर्णी

मनसे आणि शिवसेना युतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाने मनसेला साधारणपणे ६५ ते ७० जागा सोडल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० ते १२ जागा सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज युती आणि जागावाटपाबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?
MNS-Shivsena: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा; लवकरच युतीची घोषणा होणार

दरम्यान, ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असलेले ब्लू सी हॉटेल हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. २०१९ रोजी अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच ब्लू सी हॉटेलमध्ये आम्ही अजूनही युतीत आहोत अशी घोषणा केली होती. मात्र निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळाले. आज त्याच ब्लू सी हॉटलमध्ये तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युती घोषित करणार आहेत.

MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?
MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, संजय राऊतांनी तारीख अन् वेळ सांगितली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com