थरारक! अचानक रेल्वे इंजिनमध्ये अडकला भला मोठा दगड; पुढे काय झालं? वाचा....

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील मंकी हिल दरम्यान मोठी दरड कोसळी आहे.
Maval Landslide
Maval LandslideSaam Tv
Published On: 

मावळ - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीवर ही झाला असून लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-मुंबई(Mumbai) रेल्वेमार्गावरील मंकी हिल दरम्यान मोठी दरड कोसळी आहे. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

हे देखील पाहा -

मुंबई-पुणे लोह मार्गावरील मंकी हिल याठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक मोठा दगड खाली येऊन रेल्वे इंजिनच्या समोर आडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनेची माहिती समजल्यानंतर पहाटे 3.30 वाजता रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Maval Landslide
Anna Mani : अण्णा मणी कोण आहे ? गुगल डूडलवर त्यांचा वाढदिवस का साजरा केला जातोय?

दरड बाजुला करण्याचे काम सुरु आहे. दगड रेल्वे इंजिनच्या समोरील गार्डमध्ये आडकला आहे. मागील काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे डोंगर भागातून दगड व माती पाण्याच्या सोबत खाली घसरत असल्याने असे प्रकार घडत आहे. मंक्की हिल या संपूर्ण परिसरातील रेल्वे मार्ग हा डोंगरातून असल्याने याठिकाणी वारंवार असे प्रकार घडत आहेत. याठिकाणी अप व डाऊन ह्या दोन्ही लाईन सुरु असल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच रेल्वे वाहतूक देखील सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.