Mumbai Traffic News: महाराष्ट्रदिनी मुंबईत वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी चेक करा

Mumbai Traffic News: वाहतुकीत सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत.
Traffic Police, Mumbai
Traffic Police, MumbaiSaam TV

Mumbai News : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहेत. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र असं होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाहतुकीत महाराष्ट्रदिनी काही बदल केले आहेत.

दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. (Latest News Update)

Traffic Police, Mumbai
Mumbai News: ...आधी मैत्री करतो, नंतर लुटतो आणि पळून जातो; 100 जोडप्यांची फसवणूक करणाऱ्याला अटक

वाहतुकीतील बदल

>> एल. जे.रोड जंक्शन (गडकरी जंक्शन) पासून दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत एन. सी. केळकर रोड आणि केळुस्कर रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

>> केळुस्कर रोड दक्षिण हा पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीला या मार्गाने येण्यास परवानगी असेल.

>> केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजवे वळण हे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल.

>> एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शन असा वन-वे सुरू असेल.

>> स्वातंत्र्यवीर सावरकर रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत वन-वे सुरू असेल.

>> सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणारी वाहने सिद्धिविनायक जंक्शनवर उजवीकडे वळण घेऊन एस. के.बोले रस्त्यावरून पुढे जातील, पोर्तुगीज चर्चकडे डावीकडे वळण घेऊन गोखले रोड-गडकरी जंक्शन-एल. जे. रोड-राजा बढे चौक मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील.

>> येस बँक जंक्शनपासून सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सामान्य सार्वजनिक वाहनांनी येस बँक जंक्शन-शिवाजी पार्क रोड क्रमांक ५-पांडुरंग नाईक रस्ता-राजा बढे चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे एल. जे. रोड मुंबई- गडकरी जंक्शन- नंतर गोखले रोडने दक्षिण मुंबईकडे जावे.

Traffic Police, Mumbai
Mumbai Best Bus News: मुंबईकरांनो सावधान! बसमध्ये मोठमोठ्याने फोनवर बोलाल, तर जेलमध्ये जाल; बेस्टकडून आदेश जारी

पार्किंग बंदी

>> केळुस्कर रोड (मुख्य, दक्षिण आणि उत्तर)

>> लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोड केळुस्कर मार्ग (उत्तर) ते पांडुरंग नाईक रोडपर्यंत.

>> पांडुरंग नाईक मार्ग,

>> न. चिं. केळकर रोड गडकरी चौक ते कोतवाल गार्डन.

>> संत ज्ञानेश्वर रोड.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com