Mumbai Best Bus News: मुंबईकरांनो सावधान! बसमध्ये मोठमोठ्याने फोनवर बोलाल, तर जेलमध्ये जाल; बेस्टकडून आदेश जारी

Best Bus Mobile Ban: तुम्ही जर बेस्ट बसने प्रवास करत असाल, आणि मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत किंवा गाणी वाजवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Mumbai Best Bus Mobile Ban News
Mumbai Best Bus Mobile Ban NewsSaam TV
Published On

Mumbai Best Bus Mobile Sound Ban: मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर बेस्ट बसने प्रवास करत असाल, आणि मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत किंवा गाणी वाजवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईत बसमध्ये फोनवर बोलण्यास आता मनाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Best Bus Mobile Ban News
Maharashtra Politics: कोर्लई गावातील १९ बंगल्यांची गायब झालेली फाईल सापडली; किरीट सोमय्यांचा मोठा दावा

आपल्या शेजाराच्या सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची बेस्ट प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेश ‘बेस्ट’ प्रशासनाने दिले आहेत.(Breaking Marathi News)

मुंबईत ‘बेस्ट’ बसमधून (Best Bus) दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. काही प्रवासी मोबाइलवरून अन्य व्यक्तीशी मोठय़ा आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठय़ा आवाजात गाणी ऐकतात. याचा सहप्रवासी तसेच वाहक आणि चालकांनाही त्रास सहन करावा लागतो.

वाहकाने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या. त्यांची दखल घेऊन मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणाऱ्या वा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mumbai Best Bus Mobile Ban News
Maharashtra Rain Updates: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

२४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार मोबाइलचा (Mobile) लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांना समज देण्याची सूचना चालक, वाहक आणि तिकीट तपासनीसांना करण्यात आली आहे. संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी बोलताना, गाणी ऐकताना इयर-फोनचा वापर करण्याचे आवाहन ‘बेस्ट’ने केले आहे.

दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांवर पोलिस कायद्यानुसार (कलम ३८ / ११२) नुसार कारवाई करण्यात येईल. याबाबतचे परिपत्रक बेस्टच्या सर्व बसेसमध्ये लवकरच लावण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बेस्टच्या बसने प्रवास करत असाल, तर मोबाईलवर जरा जपूनच बोलणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com