Mumbai Breaking News: मोठी बातमी! मुंबईत येत्या १८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; नेमकं कारण काय?

Section 144 in Mumbai: बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे.
Section 144 in Mumbai
Section 144 in MumbaiSaam TV
Published On

Section 144 in Mumbai 

मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील महिनाभर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Section 144 in Mumbai
Mumbai News: देवतारी त्याला कोण मारी! चौदाव्या मजल्यावरून कोसळली मुलगी, मात्र केसालाही धक्का लागला नाही

पोलिसांना (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय जाहीर सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai News) जारी केलेल्या आदेशानुसार जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जमावबंदीच्या काळात या गोष्टींवर बंदी

  • मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल.

  • कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.

  • जमाबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

  • न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल.

  • सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.

  • मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Section 144 in Mumbai
Daily Horoscope: या राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार, सर्व अडचणी दूर होणार, तुमची रास कोणती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com