Senate Election: मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांच्या तारखा जाहीर; वाचा कधी होणार मतदान

Mumbai University Senate Election News: या निवडणुकीसाठी २१ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून आणि २४ एप्रिल २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे.
Mumbai University Senate Election News
Mumbai University Senate Election News Saam TV

Mumbai University Senate Election News

मागील वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी २१ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून आणि २४ एप्रिल २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai University Senate Election News
MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय घेणार?

गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडण लांबवणीवर पडल्या होत्या. यावरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली होती. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता.

दरम्यान, विद्यापीठाने निवडणुकांना स्थगिती दिल्यानंतर याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे. (Latest Marathi News)

नव्या मतदार नोंदणी सुरू होत असताना याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेली यांनी पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही, असं सागण्यात आलं आहे. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील, असंही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सिनेट निवडणुकांचे सुधारित वेळापत्रक

  • ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर 2023 पर्यंत नव्याने मतदार नोंदणी करण्यात येईल.

  • १ डिसेंबर २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल.

  • २९ फेब्रुवारी २०२४ निवडणूक अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे.

  • ११ मार्च २०२४ रोजी उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक असेल.

  • १८ मार्च २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक

  • २० मार्च २०२४ रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

  • २१ एप्रिल २०२४ रोजी सिनेट निवडणूक पार पडणार आहे.

  • २४ एप्रिल २०२४ निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.

Mumbai University Senate Election News
Train Accident: आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण; अधिकाऱ्यांनी दिली चक्रावून टाकणारी माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com