
मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक भुयारी मेट्रो येणार आहे. वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-११ ला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाला थेट भुयारी मेट्रोने जाता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मेट्रो मार्गाच्या खर्चासाठीचा निधी मंजूर करण्यात आला होता. ही मेट्रो तयार झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होईल आणि मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद आण कमी वेळात होईल.
मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो मार्गिका-११ ही मुंबई मेट्रो मार्गिका-४ म्हणजे वडाळा-ठाणे-कासारवाडवलीचा विस्तार भाग आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून तयार करुन घेण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्यावतीने मेट्रो मार्गिका-११ या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गिकेचा ७० टक्के भाग हा भुयारी असणार आहे. यात १३ भूमिगत आणि १ भू-समतल स्थानक उभारण्यात येणार आहेत. या १७.५१ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील पायाभूत सुविधाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभाग आणि ९१६ कोटी ७४ लाक रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळविण्याकरिता विनंती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी स्वीकारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ मुळे दक्षिण मुंबईवरूव वडाळ्याला येणं सोपं होईल. ही मेट्रो तयार झाल्यानंतर मुंबईकरांना गर्दीमुक्त प्रवास करता येईल. या मार्गिकमुळे आणिक आगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, वाडी बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया ही सर्व ठिकाणे जोडली जाणार आहेत. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना या मेट्रोचा चांगला फायदा होईल आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. महत्वाचे म्हणजे या मेट्रो मार्गाच्या विस्तारामुळे थेट ठाण्याहून गेट वे ऑफ इंडियाला देखील जाता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.