
Pune MNS News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला पुण्यात मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics News)
निलेश माझिरे यांच्यासह जवळपास 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. माझिरे यांची हकालपट्टी आणि त्यांचा राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार असलेल्या निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकल्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. एकीकडे राज हे पक्ष बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना, दुसरीकडे एकाचवेळी 400 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. (Latest Marathi News)
वसंत मोरेंना राष्ट्रवादीची ऑफर
मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांनी वसंत मोरे यांना थेट प्रस्ताव दिल्याने वसंत मोरे पक्ष प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जित पवार यांनी जाहीर नियमंत्रण दिल्याला वसंत मोरे यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र, मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.