Maharashtra Politics : ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर.., सामनातून CM शिंदेंसह भाजपवर टीका

अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam TV

Shivsena vs BJP : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. त्यातच कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (ठाकरे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला लक्ष केलं आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Maharashtra Politics News)

Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकणार?, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

'शिंदे फडणवीस सरकार तंत्र-मंत्रांवर चालतंय'

“एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार (Eknath Shinde) हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. असा घणाघात सामनातून शिंदे सरकारवर करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

"शिंदे-फडणवीस सरकार हे चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे. शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल", असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Raosaheb Danve : छत्रपती शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख; टीकेची झोड उठल्यानंतर दानवेंनी मागितली माफी

'भाजपाचे हे ढोंग आहे'

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केलाय. त्यावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल. आता इथेही भाजपाच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ भाजपाचे हे ढोंग आहे. असा हल्लाबोलही सामनातून भाजपवर करण्यात आलाय.

'त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते'

"कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले. महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com