Bhausaheb Patil : ‘बीइंग भाऊसाहेब’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा

जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध ‘बीइंग भाऊसाहेब’ पुस्तकातून घेतला आहे.
Bhausaheb Patil :  ‘बीइंग भाऊसाहेब’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
Published On

Bhausaheb patil News : दिवंगत भाऊसाहेब पाटील यांना शिकण्याची आस होती. तसेच त्यांच्यात सळसळती उर्जा, संवाद कौशल्य, समन्वय आणि समस्येवर हमखास उपाय शोधण्याची तल्लख बुद्धी होती. असे श्रेष्ठ व्यक्तीमत्व दिवंगत भाऊसाहेब पाटील यांचे होते. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध पुस्तकातून घेतला आहे.

सकाळ’ प्रकाशनाच्या ‘बीइंग भाऊसाहेब’ नावाच्या या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते झाले. (Latest Marathi News)

Bhausaheb Patil :  ‘बीइंग भाऊसाहेब’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
Amitabh Bachchan Meets Messi, Ronaldo: मेस्सी-रोनाल्डोच्या भेटीसाठी बिग बी बच्चन उतरले फुटबॉल मैदानात

दिवंगत भाऊसाहेब पाटील हे ‘सकाळ’चे (Sakal) संचालक होते. भाऊसाहेब हे खऱ्या अर्थाने सहृदयी सहकारी, उत्तम गुणांचे पारखी होते. त्यांचा अफाट लोकसंपर्क होता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना होती. त्यांच्याबद्दलच्या अशा अनंत स्मृतींत ‘सकाळ’चे कुटुंब आणि भाऊसाहेबांचा मित्रपरिवार आज गढून गेला.

कधी हास्याची कारंजी तर, कधी डोळ्यांच्या कडा पाणावणारे प्रसंग! भाऊसाहेब पाटील यांच्यात आव्हानांवर मात करण्याची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा अशा बलस्थानावर त्यांनी संचालक पदापर्यंतचा प्रवास केला.

‘बीइंग भाऊसाहेब’ नावाच्या या पुस्तकाच्या (Book) प्रकाशनाच्या कार्यक्राला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार उपस्थित होते. तसेच संपादक संचालक श्रीराम पवार, भाऊसाहेब पाटील यांच्या पत्नी अलका यांच्यासह विजया पाटील, उदय जाधव, महेंद्र पिसाळ, नवल तोष्णीवाल, रवी वहाडणे, ‘सकाळ’ परिवारातील आजी-माजी सदस्य आणि भाऊसाहेबांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

‘सकाळ’ प्रकाशनच्या अमृता देसरडा यांनी हे पुस्तक शब्दबद्ध केले आहे. कर्मचारी आणि कंपनी यांच्यातल्या विलक्षण नात्याचा परिचय या पुस्तकातून उलगडा करण्यात आले आहे. भाऊसाहेब पाटील यांची कन्या वृषाली, चिरंजीव विनय यांनी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक श्रीराम पवार यांनी केले. मंदार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Bhausaheb Patil :  ‘बीइंग भाऊसाहेब’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
Anil Deshmukh News: तुरुंगातून बाहेर येताच देशमुख अॅक्टिव्ह मोडवर; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत शेतकऱ्यांसाठी केली मोठी मागणी

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेता आल्या मुलांना काम करत उच्च शिक्षणाची संधी ‘सकाळ’ने मिळवून दिली. शिक्षण घेत असताना आणि काम करण्याची संधी तरुण मुलांना उपलब्ध करून देण्याचे वातावरण संस्थेने जपले आहे. या संस्कृतीमधून प्रेरित झालेल्या मुलांनी ‘सकाळ’चा विकास केला. त्यात भाऊसाहेब पाटील हे एक होते

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ

भाऊसाहेब हे आरोग्यबद्द जागृत होते. त्यांच्या मदतीने ‘लास्ट संडे ऑफ द मंथ’ वेगवेगळ्या भागात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करता आली. कामाची आखणी आणि ते योग्यरित्या पूर्ण करण्याचे नियोजन त्यांच्याकडून शिकता आले.

- संतोष मोरे, सिंहगड रस्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com