anil deshmukh
anil deshmukh Saam Tv

Anil Deshmukh News: तुरुंगातून बाहेर येताच देशमुख अॅक्टिव्ह मोडवर; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत शेतकऱ्यांसाठी केली मोठी मागणी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
Published on

Anil Deshmukh News : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हातील संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्व्हे करुन तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयापही संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. (Latest Marathi News)

anil deshmukh
Shivsena News: शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी, आजच निकाल येण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांसोबतच संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. या नुकसानीचा सर्व्हे सुद्धा करण्यात आला होता. परंतु संत्रा व मोसंबीला सर्व्हेमधून वगळण्यात आले होते. ही बाब राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधीकारी व कृषी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती.

यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काटोल येथील फळ संशोधन केंद्राचा सर्व्हे अहवाल तयार नसल्याचे लक्षात आले. तातडीने सलील देशमुख यांनी याबाबत संबधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून नुकसानीचा सर्वे करुन तो अहवाल तयार करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वे करुन तो अहवाल २९ सप्टेंबर २०२२ ला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिला. यानंतर तो अहवाल नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आला.

anil deshmukh
Abdul Sattar News: कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा अधिकाऱ्यांवर दबाव; राष्ट्रवादी, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

मोठया प्रमाणात नुकसान होवूनही मदत न मिळाल्याने संत्रा व मोसंबी उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बांग्लादेशने आयात शुल्कात मोठया प्रमाणात वाढ केल्याने शिल्लक राहीलेल्या संत्रा व मोसंबीला भाव मिळाला नाही. अशा दुहेरी संकटातून संत्रा व मोसंबी उत्पादक जात आहे.

नागपूर (Nagpur) जिल्हातील संत्रा व मोसंबी हे मुख्य पीक आहे. यातुन जिल्हातील ग्रामीण भागातील आर्थिक गाडा चालतो. यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत ही संत्रा व मोसंबी उत्पादकांना दयावी अशी, मागणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com