Mount Mary Fair: माऊंट मेरीच्या जत्रेनिमित्त बेस्टच्या अतिरिक्त २८७ बसेस धावणार

BEST Buses: मुंबईतील वांद्रे परिसरातील माऊंट मेरीच्या जत्रा सुरू झाली असून १७ सप्टेंबरपर्यंत ही जत्रा चालणार आहे.
 Mount Mary Fair
Mount Mary FairSaam Digital

Mount Mary Fair :

मुंबईतील वांद्रे परिसरातील माऊंट मेरीच्या जत्रा सुरू झाली असून १७ सप्टेंबरपर्यंत ही जत्रा चालणार आहे. माऊंट मेरीच्या जत्रेला ख्रिश्चन बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेता बेस्टनं या जत्रेसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. एकूण २८७ बसेस सोडण्यात येणार आहेत.

वांद्रे स्टेशनपासून माऊंट मेरीपर्यंतचे अंतर साडेतीन किलोमीरटरच्या आसपास आहे. दरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. (Latest News on Best Buses)

या जत्रेला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने संपूर्ण आठवडाभर वांद्रे स्थानक (प,) ते हिल रोडदरम्यान २८७ अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. माऊंट मेरी जत्रेनिमित्त माऊंट मेरी चर्च, तसेच फादर ॲग्नल आश्रम परिसरात मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. बहुसंख्य नागरिक लोकलने वांद्रे स्थानकात उतरतात आणि तेथून बेस्ट बसमधून जत्रास्थळी पोहोचतात.

 Mount Mary Fair
Kokan Ganpati Festival: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज! एसटीच्या जादा ३१०० एसटी बसेस धावणार

मात्र बसेसचं प्रवर्तन माऊंट मेरी चर्चपर्यंत करणं शक्य होत नाही. परिणामी, जत्रा कालावधीत सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त बसेस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) आणि हिल रोड उद्यानदरम्यान धावणार आहेत. जत्रेच्या शेवटच्या दिवशी दिवसभरासाठी ९४ अतिरिक्त बसेस यात्रेतील भाविकांसाठी सोडल्या जाणार आहेत. वांद्रे पश्चिमेकडे टेकडीवर असलेले माऊंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे.

 Mount Mary Fair
Mumbai BEST Bus And Auto Accident: मुंबईत बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, 2 प्रवाशांचा मृत्यू तर एक जखमी

मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर सन १६४० मध्ये बांधण्यात आली. त्यानंतर १७६१ मध्ये पाडून त्याचे पुनःनिर्माण करण्यात आले. आंतरिक साजवटीसाठी हे चर्च प्रसिद्ध आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. दरम्यान माउंट मेरी जत्रेच्या याकाळात दररोज किमान एक लाख लोक चर्चला भेट देतात. गेल्या काही वर्षांत मेणबत्त्या, फुले, खाद्यपदार्थ, खेळणी आणि कृत्रिम दागिन्यांची विक्री करणारे तब्बल ४३० स्टॉल या मेळ्यात लावण्यात आलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com