Kokan Ganpati Festival: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज! एसटीच्या जादा ३१०० एसटी बसेस धावणार

Kokan Ganpati Festival Special St Bus: एसटीच्या गट आरक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आतापर्यंत १७०० बसेस आरक्षित
ST Bus Travel
ST Bus Travel Saam Tv
Published On

Kokan Ganpati Festival: श्री गणरायाचे १९ सप्टेंबर २०२३ रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यापैकी आज अखेर १७०० बसेसचे गट आरक्षण पुर्ण झाले आहे. गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. १४ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ST Bus Travel
Himachal Rains: हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी न एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ३१०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. (Latest Marathi News)

बसेस आरक्षणासाठी https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपव्दारे, तसेच खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे.

ST Bus Travel
Atal Pension Yojana: तुम्हालाही मिळू शकते दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या 'अटल पेन्शन योजने'चे फायदे

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com