'दृश्यम'पेक्षाही भयंकर! पतीला गुंगीचं औषध, बॅटने मारहाण अन् घरातच सिमेंटचा कट्टा... त्या' एका कॉलने उलगडलं मोठं रहस्य

Baramati Wife Tried To Bury Husband Alive Case Details: बारामतीत धक्कादायक घटना उघडकीस! पत्नीने पतीला जिवंत पुरण्याचा कथित कट रचल्याचा आरोप. 112 वर आलेल्या गूढ फोनमुळे भरत फोर्ज कर्मचाऱ्याचा जीव वाचला.
BARAmATI SHOCKER: WIFE’S ALLEGED PLOT TO BURY HUSBAND ALIVE FOILED AFTER 112 CALL
BARAmATI SHOCKER: WIFE’S ALLEGED PLOT TO BURY HUSBAND ALIVE FOILED AFTER 112 CALLsaam tv
Published On

मंगेश कचरे, साम टीव्ही

बारामतीमध्ये उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेनेमोठी खळबळ उडाली आहे. दृश्यम चित्रपटालाही मागे टाकणाऱ्या या थरारक प्रकरणात एका महिलेने आपल्या पतीला ठार मारून घरातच जिवंत पुरण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र डायल 112 वर आलेल्या एका फोनमुळे हा कट उधळला गेला आणि भरत फोर्जमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश कान्होबा जगताप (७१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (३८) हिला आरोपी करण्यात आले आहे.

BARAmATI SHOCKER: WIFE’S ALLEGED PLOT TO BURY HUSBAND ALIVE FOILED AFTER 112 CALL
अमानुष छळ, अनैतिक संबंध अन्... नंतर 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीला संपवलं, भारतीय लष्काराच्या जवानाचं विकृत कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रवीण प्रकाश जगताप (वय 41) हे भरत फोर्जमध्ये कार्यरत आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे तपासात समोर आली आहे.

BARAmATI SHOCKER: WIFE’S ALLEGED PLOT TO BURY HUSBAND ALIVE FOILED AFTER 112 CALL
Nandurbar Crime: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार, मोबाइलमध्ये २०० हून अधिक अश्लिल व्हिडीओ सापडले; नंदुरबार हादरले

दरम्यान, आरोपी महिलेने पतीला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर क्रिकेट बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घरातच बांधलेल्या सिमेंटच्या कट्ट्यात त्याला पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, याचवेळी डायल ११२ वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हा थरारक कट उधळण्यात यश मिळवले. पोलिसांच्या या वेळीच हस्तक्षेपामुळे पीडिताचा जीव वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com