शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले, पवारांचं विसर्जन...

'विश्वासघाताने आलेलं सरकार टिकलं नाही. बारामतीकरांना लुबाडून घेण्यात फार आनंद आहे.'
Sharad Pawar Vs Gopichand Padalkar
Sharad Pawar Vs Gopichand Padalkar Saam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: आपण सर्वजण ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांच विसर्जन करायचं आहे त्यासाठीच आज बारामतीत आलो असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे. बारामतीत आज भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान बोलत असताना पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

याआधी देखील पडळकर यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. अशातच आज पुन्हा पडळकरांनी पवारांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं.

बैठकीदरम्यान बोलताना पडळकर म्हणाले, 'आपण सर्वजण ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांच विसर्जन करायचं आहे. त्यासाठीच आज बारामतीत आलो आहे. आपण जिल्ह्यात संघटन टिकवलं आहे, विश्वासघाताने आलेलं सरकार टिकले नाही.

पाहा व्हिडीओ -

बारामतीकरांना लुबाडून घेण्यात फार आनंद आहे. विश्वासघाताने सरकार आलं तेव्हाच्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे वरमाईप्रमाणे नटल्या होत्या असं वक्तव्यही पडळकरांनी केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'निर्मला सितारमण या बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर असल्यामुळे पवारांना ते कळणार नाही. जनता आता तुम्हाला सक्तीच्या विश्रांतीवर पाठवेल, ५० वर्षे तुम्ही खूप सेवा केली आता बास अशी टीकाही त्यांनी पवारांवर केली.

Sharad Pawar Vs Gopichand Padalkar
BMC Election: शहांच्या वक्तव्यानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर; तातडीने बोलावली बैठक

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दोनवेळा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. मात्र, त्यात बारामतीचा सहभाग नाही याचं दु:ख आहे. बारामती ही पवारांची टेकडी आहे. फार काही मोठं नाही, यांचे राजकारण अधिकारी वर्गामार्फत चालतं. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आता सत्ता आली आहे.

तसंच या आधी यांना कधी गणपतीची आरती करताना कधी पाहिलं नव्हत, मात्र, आम्ही कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून प्रचार सुरु करतो हे त्यांना लोकांना सांगावं लागलं, हे भाजपचे यश आहे. तुम्ही आता निवांत मोट बांधत बसा कसल्या बैठका घेताय, कर्जत जामखेडला नातू पाठवला.

२००९ साली माढात गेले, लोकांनी निवडून दिलं, पण काहीच काम केले नाही. २०१९ मध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून माघार घेतली असंही पडळकर म्हणाले. आजच्या या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,आमदार राम शिंदे, पुणे भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com