Baramati News : बारामतीत रक्तरंजित थरार, महाविद्यालयात घुसून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या; परिसरात खळबळ

Baramati Breaking News : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची महाविद्यालयात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली.
Baramati 12th student murder
Baramati 12th student murderSaam TV
Published On

पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत असतानाच आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बारामती येथील एका महाविद्यालयात घुसून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता ३०) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अथर्व पोळ, असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Baramati 12th student murder
Shirur News : क्रिकेट खेळताना घडलं भयंकर, बॉल काढताच 12 वर्षीय मुलाचा गेला जीव; शिरुर तालुक्यातील घटना

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून (Police) त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली असून महाविद्यालयासमोर पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांकडून सध्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती (Baramati News) येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ही घटना घडली आहे. मृत तरुण आणि आरोपी एकाच वर्गात शिकत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यानंतर एकाने दुसऱ्यावर कोयत्याने वार केला.

या हल्ल्यात अथर्व पोळ याला गंभीर दुखापत झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अथर्व याला मृत घोषित केले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. महाविद्यालयात खून झाल्याचं कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Baramati 12th student murder
Pune Crime News : पुणे हादरलं! हडपसरमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com