शरद पवार यांच्या बारामतीत आज (२ मार्च) महायुती सरकारतर्फे नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवार यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे बारामतीत आज काका-पुतण्या एकाच मंचावर येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवर सुरुवातील शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव नव्हतं. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर सरकारने सारवासारव करत नवीन निमंत्रण पत्रिका काढत त्यात शरद पवार यांचं नाव नमूद केलं आहे.
नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास ४३ हजार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील उद्घाटन होणार आहे. (Latest Marathi News)
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) या मेळाव्याच्या माध्यमातू बारामतीत शक्ति प्रदर्शन करणार असल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला, तरी या कार्यक्रमात राजकीय भाषणं पाहायला मिळणार आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहिल्यास कार्यक्रम आणखीच रंजक होण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.