बारामतीतील ADT आणि अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाचा करार; AI आधारित शेतीला मिळणार चालना

AI Based Farming Training Program In Baramati: बारामतीतील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Training session underway in Baramati as ADT collaborates with Nebraska University for AI-driven agriculture research
Training session underway in Baramati as ADT collaborates with Nebraska University for AI-driven agriculture researchSaamTv
Published On

मंगेश कचरे, साम टीव्ही

पुणे: बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) आणि अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने परस्परांशी नुकताच तीन वर्षांसाठीचा सामंजस्य करार केला आहे. सोयाबीन व मका पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन तसेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या कराराचा उद्देश आहे. करारानंतर तत्काळ अंमलबजावणी करत बारामती परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, पुढील काही महिन्यांत त्याचे आणखी तीन टप्पे होणार आहेत.

Training session underway in Baramati as ADT collaborates with Nebraska University for AI-driven agriculture research
Mumbai Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी! व्यावसायातील चढाओढीत जीवघेणा हल्ला, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरातून केलेल्या संशोधनामुळे अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत उस शेतीतील अनेक यशोगाथा निर्माण झाल्या असून, या कार्याची दखल उद्योगपती एलॉन मस्क व मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्यम नडेला यांनी घेतल्याने संस्थेचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे.

Training session underway in Baramati as ADT collaborates with Nebraska University for AI-driven agriculture research
Pune Tracffice Police Viral Video : वाहतूक पोलिस Atish Kharade यांची अनोखी शक्कल

या सामंजस्य करार करताना पार पडलेल्या प्रशिक्षणाच्या प्रारंभी झालेल्या आभासी कार्यशाळेत USDA-ARS अ‍ॅडॅप्टिव्ह क्रॉपिंग सिस्टम प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांना मार्गदर्शन केले. यात पीक वाढ, माती प्रक्रिया, हवामानाचा प्रभाव, सिंचन व खत व्यवस्थापन या बाबींचा सखोल अभ्यास CLASSIM सिम्युलेशन टूलच्या माध्यमातून करण्यात आला. सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञांना पीक वर्तन विश्लेषणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

यानंतर नेब्रास्का वॉटर सेंटरचे डॉ. क्रिस प्रोक्टोर, डॉ. जुडे कोबिंग व डॉ. चित्तरंजन राय यांनी मका व सोयाबीन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. स्थानिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञानात बदल केल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ कसा मिळू शकतो, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सकारात्मक अनुभव व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com