Junnar: कर्मचाऱ्याकडून बँकेतील 104 तोळे सोन्यावर डल्ला, सीसीटीव्ही बंद करत चोरलं सोनं

जुन्नरमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच बँकेतील लॉकरवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
Junnar
JunnarSaam Tv
Published On

पुणे: जुन्नरमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच बँकेतील लॉकरवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेत नागरिकांनी गहाण आणि तारण ठेवलेल्या 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 104 तोळे सोन्यावर बँकेच्याच कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विकास खिल्लारी असे बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे (Bank employee robbed 51 lakh Rs gold jewellery from bank).

वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेत (Bank) 9 व्यक्तींचे 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 104 तोळे सोने (Gold) गाहाण आणि तारण होते. यावेळी कर्मचारी असलेल्या विकास खिल्लारी याने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन लॉकरमधून सोने लंपास केले. याबाबत आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास खिलारी या बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com