

रश्मी पुराणिक -
मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात उमेदवार उभा न करता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन महापार्टीने घेतला आहे. त्यामुळे भाजपला कोल्हापुरात आता डबल आव्हान असणार आहे (Bahujan Maha Party give support to Congress for Kolhapur by-poll).
भारतीय जनता पक्ष (BJP) हा जातीयवादी पक्ष असून देशात महागाई, अन्याय अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला रोखणे गरजेचे असून त्याचसाठी काँग्रेस (Congress) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत बहुजन महापार्टी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे.
बहुजन महापार्टी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी नाना पटोले (Nana Patole) यांना हे पत्र दिले आहे. बहुजन महापार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून त्यांना विजयी करण्यासाठी मेहनत करतील असे बहूजन महापार्टीने म्हटले आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.