Badlapur Fire : बदलापुरात इमारतीला भीषण आग; घरातील साहित्य जळून खाक

Badlapur Fire News: बदलापुरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली.
Badlapur Fire News
Badlapur Fire NewsSaam tv

Badlapur Fire Update :

बदलापुरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावरील घराला आग लागली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या शिरगाव परिसरात वेदांत वाटिका या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या एका घराला भीषण आग लागली होती. घराला लागलेल्या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले.

Badlapur Fire News
Bharat Jodo Nyay Yatra : मुंबईत इंडिया आघाडीची जंगी सभा; देशातील कोणते नेते उपस्थित राहणार? यादी पाहा

या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात आग लागली. त्यामुळे या घराच्या वरच्या मजल्यावरील दोन घरांना आगीची झळ पोहोचली आहे. आग लागल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने इमारत तातडीने रिकामी करण्यात आली होती.

Badlapur Fire News
Pune Crime: दुहेरी हत्याकांडानं पुणे हादरलं; पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत घराचं मोठं नुकसान झालं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Badlapur Fire News
Chandrapur Fire News : A to Z बाजाराला भीषण आग, गॅस सिलिंडरचा ब्लास्ट; दाेन घरे जळून खाक

येरवाड्यात लाकडी साहित्याला भीषण आग

पुण्यातील येरवडयात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली. पुण्यातील येरवडयात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीत गोडाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले. या आगीमुळे गोडाऊनमधील साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com