अयोध्येत २२ तारखेला होणाऱ्या सोहळ्याकडं (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील केली जातेय. मंदिर आणि रामलल्लाच्या मूर्तीविषयी आता काही माहिती समोर येतेय. अयोध्येत साकारणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीचं थेट बदलापूर कनेक्शन देखील समोर आलं आहे. (latest ram mandir news)
देशातील चार चित्रकारांच्या चित्राच्या आधारे रामलल्लाची मूर्ती तयार केली गेली आहे. या चार चित्रकारांमध्ये बदलापूरच्या (badlapur) चित्रकाराचा देखील समावेश आहे. बदलापूरच्या चित्रकाराने मूर्तीसाठी चित्र तयार केलं आहे. ते चित्रकार कोण आहेत, त्यांनी हे चित्र कसं साकारलं हे आपण येथे सविस्तर जाणून घेवू या. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कुणी साकारलं राम लल्लांचं चित्र
बदलापुरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी अयोध्येतील राम लल्लाच्या मुख्यमूर्तीसाठी चित्र (ram mandir) साकारलं आहे. या चित्राचा काही भाग मूर्ती साकारताना स्वीकारण्यात आलाय. देशभरातील दिग्गज चित्रकरांकडून रामलल्लाच्या मूर्तीसाठी चित्र मागवण्यात आलं होतं. त्यात सचिन जुवाटकर यांच्याही चित्राचा समावेश होता.
अयोध्येत (ayodhya) साकारण्यात आलेल्या राम मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मुख्य मूर्तीचं कोरीव काम करण्यासाठी देशभरातील दिग्गज चित्रकारांना रामलल्लाचं (ram) चित्र रेखाटण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार देशभरातील अनेक चित्रकारांनी मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या कल्पकतेचा विचार करून चित्र साकारलं होतं. मात्र समितीने या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर देशभरातील चार चित्रकारांचे चित्र स्वीकारले. त्यात मुंबईचे वासुदेव कामत आणि बदलापूरचे सचिन जुवाटकर यांच्या चित्राचा समावेश होता. तर समितीशी संलग्न असलेले चित्रकार विश्वकर्मा यांच्या देखील चित्राचा महत्त्वाचा भाग मूर्ती तयार करताना स्वीकारण्यात आला. देशभरातील चार दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या चित्राच्या आधारावरच अयोध्येतील राम लल्लाची (lord ram) मूर्ती साकारण्यात आली आहे. डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांच्या देखरेखीखाली राम मंदिराची उभारणी केली जात आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला राम लल्लाची सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया जुवाटकर यांनी दिली आहे.
ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांची प्रतिक्रिया
अयोध्येत (Ayodhya Temple) साकारण्यात आलेल्या राम लल्लाच्या मूर्तीसाठी जे चित्र निश्चित करण्यात आलं आहे. त्या चित्राचा वापर मुख्य निमंत्रण पत्रिकेवर देखील करण्यात आलाय. ' राम लल्लाची मूर्ती साकारण्यासाठी जे चित्र अपेक्षित होतं, ते चित्र पाठवण्यासाठी मला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कल्पना दिली होती. त्यांच्यामुळंच आज आपल्या चित्राचा काही भाग रामलल्लाच्या मूर्तीत वापरला जातोय. याचा आपल्याला कायमस्वरूपी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी दिलीय.
या सोहळ्यासाठी मोठमोठे दिग्गज हजेरी लावणार आहेत. यामुळे सुरक्षा व्यवस्थाही अगदी कडक करण्यात आलीय. देश-विदेशातील पाहुण्यांना याप्रसंगी निमंत्रणं पाठविण्यात आली आहे. भक्तांमध्ये या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.