Pune News : प्रवाशाकडून महिला रिक्षा चालकावर अत्याचाराचा प्रयत्न; पुढे महिलेने जे केलं त्याचं पोलिसांकडूनही कौतुक

रिक्षा चालक महिलेने मोठ्या हिमतीने आरोपीला विरोध केला. त्यानंतर आरोपीने पळ काढला.
Pune Police
Pune Police Saam TV
Published On

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होत आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा देखील पुण्या ऐरणीवर आला आहे. कारण पुण्यात महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. (Latest Marathi News)

Pune Police
समृद्धी महामार्गाच्या नावातून बाळासाहेबांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळणारे झारीतले शुक्राचार्य कोण? आमदार चेतन तुपेंचा सवाल

प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील कात्रज घाटात ही घटना घडली आहे. रिक्षा चालक महिलेने मोठ्या हिमतीने आरोपीला विरोध केला. त्यानंतर आरोपीने पळ काढला.

कात्रज घाटात २६ डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला.निखिल मेमजादे असं आरोपीचं नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Pune News)

Pune Police
Jalgaon News: दारू पिणाऱ्यांवर थर्टी फस्‍टच्‍या रात्री भरारी पथकाची नजर; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १३२७ गुन्‍हे

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील मगरपट्टा सिटी येथून महिलेच्या रिक्षात बसला होता. त्यानंतर हळूहळू आरोप महिलेशी जवळीक साधण्यासाठी बोलू लागला. कात्रज चौकपर्यत येईपर्यंत त्याने अश्लील बोलणं सुरु केल.

मात्र कात्रज घाटात पोहोचताच त्याने वेगळ्या प्रकरची मागणी रिक्षा चालक महिलेकडे केली. मात्र रिक्षाचालक महिलेने रिक्षा पुन्हा कात्रज चौकात वळवली असता आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर महिलेना पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोप आपला फोनही रिक्षात विसरला होता. त्यामुळे फोनच्या आधारे पोलिसांना आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com