Breaking News: आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला 7 ऑक्टोबर पर्यंत NCB कडून कोठडी सुनावण्यात आली होती. आज आर्यन खान ला NCB मधून काही वेळेतच सह अन्य आरोपींना मेडिकल साठी रुग्णालयात नेण्यात आलं होत. त्यानंतर किल्ला कोर्टात नेण्यात आलं होत.
Breaking News: आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Breaking News: आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगीSaam Tv

वैदेही काणेकर

मुंबई : ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला 7 ऑक्टोबर पर्यंत NCB कडून कोठडी सुनावण्यात आली होती. आज आर्यन खान ला NCB मधून काही वेळेतच सह अन्य आरोपींना मेडिकल साठी रुग्णालयात नेण्यात आलं होत. त्यानंतर किल्ला कोर्टात नेण्यात आलं आहे. NCB ने आर्यनची आणखी एक दिवसाची कास्टडी मागण्याची शक्यता होती. आज आज आर्यन खान ला बेल मिळणार की जेल? यावर प्रश्नचिन्ह होते. आज कोर्टात हजार केले असता त्याला 11 October पर्यंत पोलीस कोठडीची मागणी एनसीबी ने केली होती. तर कोर्टाकडून, अर्चित कुमारला NCB कोठडी 9 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आर्यन खानच्या वकिलांनी आर्यन च्या जमीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर आर्यन खानच्या जामीनावर NCB ला उद्या सकाळी उत्तर देण्याचे कोर्टाने सांगितलं आहे. लिखीतमध्ये उत्तर द्यावं लागेल. सरकारी वकीलांनी सांगितलं आम्ही जामीनाला विरोध करणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

सरकारी वकिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून माहिती मिळाली आहे. आर्यन खान आणि अरबाज यांच्याकडून अर्चितचं नाव समोर आलं आहे. तर अर्चित सप्लायर आहे. अर्चित कुमारला अटक केली. त्यांच्याकडून 6 ग्रॅम गांजा मिळाला आहे. अर्चित गांजा नेटवर्कचा भाग आहे. अशी माहिती मिळाली आहे.

तर या आरोपावर, अर्चितचे वकील म्हणाले, NCB खोटं बोलत आहे. अर्चित ची अटक ही अवैध आहे, माझ्याकडे सिसीटीव्ही आहे जो मी रेकोर्ड वर ठेवतो. NCB च म्हणणं आहे की अर्चित सप्लायर आहे. मग सेक्शन का नाही टाकले? एकीकडे सप्लायर म्हणतात आणि रिकव्हरी 2.6 ग्राम केली. तर कोर्टाने यावर लक्ष दिलं पाहिजे.

अर्चितच्या वकिलांच्या युक्तिवादाचा आधार घेत, कोर्टाने एनसीबी वकिलांना विचारलं, - "5 तारखेला ताब्यात घेऊन अटक दाखवली तर तुम्ही आरोपीला 6 ला कोर्टात हजर करायला हवं होतं. माझे मित्र अश्विन थुळ त्यांच्या युक्तिवादात फक्त खोटं खोट खोट असा उल्लेख करतायत सध्या हा ट्रेंड झालाय".

एनसीबीचे वकील अद्वैत सेठना म्हणाले, एनसीबीचे अधिकारी रात्रंदिवस काम करतायत. आरोपींची कस्टडी हवी आहे जेणेकरून चौकशी करता येईल.

सरकारी वकिलांनी पुढे माहिती दिली की, आर्यन खानच्या जबाबानंतर अर्चितकडे चौकशीत ड्रग्स मिळाले आहेत. अर्चित कुमार आणि आर्यन खानला समोरासमोर चौकशी करायची आहे. NCB ला ड्रग्स गॅंगचा शोध लावायचा आहे.

पुढे आर्यन चे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, आर्यन खानला चौकशीत त्याच्या परदेशातील वास्तव्याबद्दल विचारण्यात आलं आहे. आर्यनला पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असे मानेशिंदे म्हणाले.

दरम्यान, मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Criuse Drugs Party) ड्रग पार्टी सुरु होती, ज्यावर NCB ने धाड टाकली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा Aryan Khan मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. त्याची काल मेडिकल टेस्ट झाली होती त्यात त्याने ड्रग्स सेवन केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्याला काल NCB ने एक दिवसची कोठडी सुनावली होती. आज आर्यनला किला कोर्टासमोर हजर केलं असता त्याच्या कोठडीत वाढ झाली आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत कोठडीत वाढ झाली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) चे पथक तपासणीसाठी पोहचले. यावेळी आणखी 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मुंबईच्या किनाऱ्याजवळ कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी Rave Party सुरु होती. त्यावेळेस शनिवारी NCB ने छापा टाकला आणि या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा Shahrukh Khan मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला एनसीबी कडून अटक करण्यात आली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com