Aryan Khan: आर्यन खानला दिलासा; पासपोर्ट परत देण्याचे आदेश

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा दिला आहे.
Aryan Khan Case
Aryan Khan CaseSaam Tv

मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा दिला आहे. एनसीबीला पासपोर्ट परत देण्याचे सत्र न्यायालयाने निर्देश दिले आहेत. एनसीबीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात आर्यन खानला वगळण्यात आले होते. त्यामुळे आता आर्यन खान याला दिलासा मिळाला आहे.

Aryan Khan Case
पर्यटकांना खुणावतोय वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; पर्यटकांची तुफान गर्दी

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान याला मागिल वर्षी क्रूज ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. २ ऑक्टोंबर २०२१ रोजी आर्यन ला एनसीबीने ताब्यात घेतले होते. आर्यनला २८ दिवस झेलमध्ये ठेवण्यात आले होते. अनेक महिन्यांपासून ही केस कोर्टात सुरू होती. यावर्षी मे महिन्यात एनसीबीने आर्यन खानला क्लिन चिट दिली. तर क्लिनचिट मिळाल्यानंतर आर्यन खानने एनडीपीएस कोर्टात पासपोर्ट परत मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Aryan Khan Case
Income Tax: अलर्ट! मोठ्या रकमेच्या ट्रान्झेक्शनवर IT ची नजर, या गोष्टी लक्षात आल्या तर येईल नोटीस

कोर्टात एनसीबीने काय सांगितले?

आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याच्या याचिकेनंतर न्यायालयाने एनसीबीकडून उत्तर मागितले होते. सुनावणीदरम्यान एनसीबीने आर्यन खानला पासपोर्ट परत करण्यास हरकत नाही. एनसीबीच्या वतीने विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी न्यायालयात दोन पानी उत्तर सादर केले. एनसीबीने आपल्या उत्तरात म्हटले आहे, की जामीन बॉण्ड रद्द करण्यास आणि पासपोर्ट परत करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही. मात्र आदेशात ‘डिस्चार्ज’ हा शब्द लिहिल्याबद्दल एनसीबीने आक्षेप घेतला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com