Income Tax: अलर्ट! मोठ्या रकमेच्या ट्रान्झेक्शनवर IT ची नजर, या गोष्टी लक्षात आल्या तर येईल नोटीस

प्राप्तिकर विभागाकडून आता करदात्यांच्या प्रत्येक व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे. खर्च आणि ट्रान्झेक्शनशी संबंधित आकड्यांचाही समावेश आहे.
Income Tax
Income TaxSaam Tv
Published On

मुंबई: प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax ) आता करदात्यांच्या प्रत्येक व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे. खर्च आणि ट्रान्झेक्शनशी संबंधित आकड्यांचाही समावेश आहे. निश्चित मर्यादेपेक्षा अधिक आर्थिक देवाण-घेवाण केली असेल तर, त्याची माहिती आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर (ITR) फाइल करताना उघड केली नाही तर, प्राप्तिकर विभागाकडून संबंधितांना नोटीस बजावली जाऊ शकते.

प्राप्तिकर विभागाने (Income Tax ) अशा प्रकारच्या देवाण-घेवाणींवर नजर ठेवण्यासाठी अनेक सरकारी एजन्सी आणि वित्तसंस्थांशी करार केल्याची माहिती आहे. करदात्यांची गैरसोय होणार नाही यासाठी या विभागाकडून जागृती मोहीम राबवण्यात येत आहे. अशा वेळी करदात्यांना अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती असायला हवी. त्यामुळे आयकर विभागाकडून नोटीस येणार नाही.प्राप्तिकर विभागाची मुख्यत्वे सहा प्रकारच्या देवाण-घेवाणींवर नजर असते.

Income Tax
Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्रात येत्या ४८ तासात अतिवृष्टी; हवामान विभागाने दिला इशारा

बचत आणि चालू खात्यात जमा रक्कम

आयकर विभागाच्या (Income Tax)म्हणण्यानुसार, करदात्यांना आपल्या बचत आणि चालू खात्यात वर्षाला निर्धारित मर्यादेपेक्षा अधिकची देवाण-घेवाणीची माहिती द्यावी लागेल. त्यानुसार, बचत खात्यात एका आर्थिक वर्षात १० लाख लाख रुपयांपेक्षा अधिक जमा किंवा ती काढल्याची माहिती देणे गरजेचे आहे. तर चालू खात्यात ही रक्कम ५० लाखांपर्यंत असेल.

बँकेतील जमा असलेली एफडी

जर तुम्ही एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत बँकेत १० लाखांहून अधिक रकमेची एफडी केली असेल तर, आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. बँकेकडून याबाबतची माहिती आयकर विभागाच्या फॉर्म ६१ ए द्वारे दिली जाते. ही रक्कम एकाच एफडीची असो की अनेक एफडी मिळून, त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.

Income Tax
सरपंचाची निवड जनतेतूनच करा, भाजपच्या बड्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

क्रेडिट कार्डचे बिल

जर तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल १ लाख रुपयांपेक्षा जास्त आले असेल तर, आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी लागेल. याशिवाय जर क्रेडिट कार्डाची सेटलमेंट १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याची माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते.

अचल संपत्तीची खरेदी-विक्री

देशभरात रजिस्ट्रार आणि सब - रजिस्ट्रारला ३० लाख रुपयांहून अधिक किंमतीची अचल संपत्तीची खरेदी-विक्रीची माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. आयटीआरमध्ये याची माहिती दिली नसल्यास नोटीस येऊ शकते.

शेअर, एमएफ, बाँडसंबधीत व्यवहार

कोणत्याही एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत जर म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बाँड आणि डिबेंचरमध्ये गुंतवणुकीची सीमा १० लाखांपेक्षा अधिक असेल तर, त्याची माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. या प्रकारे व्यवहाराची माहिती वार्षिक माहिती परतावा विवरणाच्या स्टेटमेंटमध्ये असते. तुमच्या फॉर्म २६ एएसमधील भाग ई मध्ये या सर्व व्यवहारांशी संबंधित माहिती असते.

विदेशी चलन विक्री

आर्थिक वर्षात १० लाख रुपयांहून अधिक विदेशी चलन विक्री केली असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर असाल. म्हणून त्याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com