मावळ, पुणे: नामवंत साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पहाटे पाच वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तके लिहिली होती. (Artists who acted in Babasaheb's Jaanta Raja Natak shared beautiful memories)
हे देखील पहा -
जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाटकही लिहिलं आणि सदरही केलं. मात्र मावळमधील तळेगाव दाभाडेमधील नागरिकांसोबत1980 सालापासून त्याचें वेगळेच ऋणानुबंध जुळले होते. मावळात अनेक गड-किल्ले आहेत. तिकोना तुंग, राजमाची लोहगड या किल्ल्यावर ते मावळ्यांना घेऊन जाऊन तेथील शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेब सांगत होते. त्यानंतर जाणता राजा या महानाट्याची मुहूर्तमेढ याच तळेगाव दाभाडे मध्ये रोवल्या गेली. मावळातील अल्हाददायक थंड वातावरण त्यांना फारच आवडायचं, त्यामुळे आठ-दहा दिवस तळेगाव मध्येच मुक्कामी राहत असे.
तळेगाव दाभाडे मधील अनेक नवोदित कलाकारांना घेऊन त्यांनी जाणता राजा हे महानाट्य तयार केले यातील एक कलाकार म्हणजे रमेश जाधव. बाबासाहेबांच्या दुःखद निधनाने जाधव यांना फार दुःख झाले झाले. जाणता राजा या महानाट्यामध्ये जाधव यांनी आपले दोन्ही मुले अभिनय करायला बाबासाहेबांना सोपवले होते अशा अनेक आठवणींना रमेश जाधव यांनी साम टीव्ही बोलताना उजाळा दिला.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.