"आर्मी भरती तसेच पिंपरी चिंचवड पोलीस भरती चे पेपर फुटले नाहीत"

पिंपरी चिंचवड पोलिस दलातील पोलिस भरती प्रक्रियेला बदनाम करण्यासाठी मुद्दामहून चुकीच्या बातम्या देण्यात आल्या, असा दावा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशगोपाल मोटघरे
Published On

पिंपरी-चिंचवड : आर्मी भरती तसेच पिंपरी चिंचवड पोलीस भरती चे कोणतेही पेपर लीक झाले नाहीत. पेपर फुटीबद्दल देण्यात आलेल्या बातम्या निरर्थक आहेत.  पिंपरी चिंचवड पोलिस दलातील पोलिस भरती प्रक्रियेला बदनाम करण्यासाठी मुद्दामहून चुकीच्या बातम्या देण्यात आल्या, असा दावा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला आहे. सैन्य दलात नोकरी मिळवून देतो म्हणून प्रवीण जगन्नाथ पाटील, महेश सुरेश वैद्य, अनिल रामदास चव्हाण, तुषार उर,  कैलास डुकरे या आरोपींनी काही उमेदवारांना भरतीचे अमिष दाखवलं होतं.

हे देखील पहा :

त्यासाठी आरोपींनी काही उमेदवारांकडून त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि काही रक्कम आगाऊ मध्ये घेतली होती. मात्र, फसवणूक होत असल्याचे लक्ष्यात येताच उमेदवारांनी निगडी पोलिसात धाव घेऊन या आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अनिल रामदास चव्हाण हा आर्मी मध्ये हवालदार या पदावर कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती निगडी पोलिसांना मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
उद्यापासून बीड जिल्ह्यातील 3 हजार 685 शाळेत गुंजणार चिमुकल्यांचा किलबिलाट!
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!

हा गुन्हा सैन्य भरती प्रक्रियेशी निगडीत असल्याने आम्ही सैन्याची प्रतिमा जपण्यासाठी या विषयावर बोलणं टाळलं होतं, असं कृष्णप्रकाश यांनी सांगितलं. मात्र, या गुन्ह्याशी सैन्यभरती किंवा पोलिस भरतीतील पेपर फुटीचा कोणताही संबंध नाही.  अशाप्रकारे कोणतीही पेपर फुटी झालेली नाही पेपर फुटी विषयी देण्यात आलेल्या बातम्या निरर्थक आहेत.  अशी माहिती कृष्णप्रकाश यांनी आज संध्याकाळी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com