बीड : उद्यापासून राज्यातील अनेक भागात शाळा सुरू होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात देखील तब्बल 3 हजार 685 शाळा सुरू होणार आहेत. यामुळं जवळपास दीड वर्षांपासून चिमुकल्यांच्या आवाजापासून ओस पडलेल्या शाळांमध्ये, उद्यापासून चिमुकल्यांचा किलबिलाट गुंजनार आहे.बीड जिल्ह्यात जिल्हापरिषद अन खाजगी आशा मिळून 3 हजार 685 शाळा आहेत. तर या शाळेवर 22 हजार 886 शिक्षक आहेत.
हे देखील पहा :
त्यापैकी कोविड-19 लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले 19 हजार 22 शिक्षक असून 3 हजार 811 शिक्षकांनी लसीकरणाचा एक डोस घेतलाय. तर 63 जणांनी अद्याप एकही लसीचा डोस घेतला नसून ते रजेवर आहेत. तर, याविषयी शिक्षणाधिकारी विक्रम सारूक म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शाळा सुरू करण्यासंदर्भात, एक बैठक पार पडलीय. यामध्ये जिल्ह्यातील 3 हजार 685 शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आम्ही सर्व शाळा सॅनीटाईज करून घेतल्या आहेत.सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले असून ज्या शिक्षकांनी लसीकरण केले नाही, त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. आम्ही उद्यापासून सर्व शाळा अगदी सकारात्मक ऊर्जेने सुरू करत आहोत. एकप्रकारचा प्रवेश उत्सवासारखा उत्सव करुण आम्ही या शाळा सुरू करत आहोत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी दिली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.