Mumbai News: आपला दवाखाना : जाणून घ्या कुठे किती आहेत दवाखाने? काय आहे ही संकल्पना?

Apla Davakhana: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेला आज वर्ष पूर्ण झाले.
Apla Davakhana
Apla DavakhanaSaam Tv
Published On

Apla Davakhana In Mumbai:

संपूर्ण मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरवत आहे. दरम्यान यातून चांगली सेवा मिळाली नाही तर नागरिकांना तक्रार करता येणार आहे. (Latest News)

आरोग्याशी संबंधित सुविधा अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनी अशा योजनांच्या निमित्ताने अभिप्राय देण्याची आता वेळ आहे. जेणेकरून या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे नागरिकांना देणे सुलभ होईल. यासाठी आत आपला दवाखान्यांच्या ठिकाणी अभिप्राय पेटी ठेवण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेला आज वर्ष पूर्ण झाले. या वर्षाकाठी आपला दवाखान्यांबाबत रचलेल्या जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफीतीचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज केले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. नागरिकांना आपला दवाखाना अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांचे अभिप्राय देता यावेत यासाठी दवाखान्यांच्या ठिकाणी सूचनापेटी ठेवण्यासोबतच अभिप्राय देण्याचीही सुविधा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सध्या आपला दवाखान्यांची संख्या ही १९४ पर्यंत पोहचली आहे. दरम्यान मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत ऑक्टोबर महिन्यात आणखी ७ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची भर पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १३ पैकी ६ दवाखाने सुरू झाले आहेत. या नव्या रुग्णालयाच्या संख्येमुळे आपला दवाखान्यांची संख्या २०० वर पोहोचली आहे.

आतापर्यंत २३ लाख नागरिकांना आपला दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. दरम्यान सद्यपरिस्थितीतील बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध १९४ ठिकाणी आपला दवाखाने असून २८ ठिकाणी पॉलीक्लिनिक, तर १६६ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. यानुसार १९४ ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार उपलब्ध आहे.

काय आहे ‘आपला दवाखाना’योजना?

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची आरोग्य योजना आहे. राज्यभरात हे दवाखाने सुरू केले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना’च्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. महत्त्वाचं म्हणजे या दवाखान्यात रुग्णांना केस पेपर काढण्याची गरज नसते.

Apla Davakhana
महाराष्ट्र नव्हे हे तर सुलतानी सरकार, 'हा' निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ : आमदार कैलास पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com