

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान (international cricket bookie sonu jalan) आणि केतन तन्ना यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात (thane nagar police station) परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. बुकी प्रकारणात खोट्या गुन्ह्यात अडकवून वरून करोडो रुपय वसूल केल्याचा आरोप जालान यांनी केला आहे. (Another case has been registered against former Mumbai Police Commissioner Parambir Singh)
परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती मिळवलेल्या प्रदीप शर्मा (Encounter specialist pradip sharma) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान (sonu jalan) यांनी केला. एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील सव्वा कोटींची वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
हे देखील पहा -
परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि एन. टी. कदम सारख्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. सध्यातरी राजकुमार कोथमिरे यांची बदली गडचिरोली येथे झाली असली तरी, त्यांच्या विरोधात देखील आपण तक्रार देणार असल्याचे जालान यांनी सांगितले. विमल अगरवाल, जुबेर अन्सारी सारखे पोलिसांचे एजंन्ट ही सगळी वसुली करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना मदतीचे आवाहन दिल्यावर सगळी सूत्र हलवून आपल्याला आज न्याय मिळेल अशी अपेक्षा जालान यांनी व्यक्त केली.
परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल (anil deshmikh) देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांच्या नशिबाचे फासेच उलटे पडले असून या आधी ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात (kopari police station) देखील काही दिवसांपूर्वी व्यावसायिक शरद अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन परमबीर सिंग यांच्यावर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये उद्योजक श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 299/ 21, कलम 387,388,389,403,409,420,423,464,465,467,468,471,120 (b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता संजय पुनमिया आणि सुनील जैन हे दोघे परमबीर सिंग यांच्यासाठी खडणी उकळायचे तसेच पोलिसांकडे 25 लाख रु खंडणी घेतल्याचा पुरावा असल्याकारणाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज दि. 29 जुलै पर्यंत मा किल्ला कोर्ट क्र 08 यांनी संजय पुनमिया आणि सुनील जैन यांना पोलीस कोठडी दिलेली होती. आज त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले असता पोलिस अभियोक्त्याच्या युक्तीवादानंतर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्या पोलीस कोठडीत आणखी 07 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांचे पक्षकार म्हणून श्री रिझवान मर्चंट न्यायालयात हजर होते
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.