कोणी घर देता का घर म्हणत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न...

कोरोना व लॉकडाऊनमुळे दस्त नोंदणीचे पैसे संपले व दस्त नोंदणी होत नव्हती.
कोणी घर देता का घर म्हणत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न...
कोणी घर देता का घर म्हणत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न...Saam Tv
Published On

सातारा - भाडळी ता.फलटण Faltan येथील नंदू पवार Nandu Pawar यांना पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर झालेले आहे. सदरील घरकुल घेण्यासाठी नंदू पवार याच्याकडे पैसे होते. परंतू फलटणच्या दस्त नोंदणीसाठीचे दुय्यम निबंधक कार्यालयात खेटे घालुन सुध्दा दस्त नोंदणी झाली नाही.

कोरोना Corona व लॉकडाऊनमुळे Lockdown दस्त नोंदणीचे पैसे संपले व दस्त नोंदणी होत नव्हती. अखेर अश्या सर्व कारणांमुळे कंटाळून नंदू पवार यांनी फलटणच्या तहसिल कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत केला.

हे देखील पहा -

यावेळी महसुल ऑफिस, नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने नंदू पवार या युवकास सुखरूप खाली उतरवण्यामध्ये यश आले असून या सर्व प्रकारामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असून सदरील युवकाचे घरकुल मंजूर झालेले आहे.

कोणी घर देता का घर म्हणत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न...
KGF 2: संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, अधीरा लूक रिव्हिल

तरी या बाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,अशी खात्री या वेळी निवासी नायब तहसीलदार आर.सी.पाटील यांनी सदर युवकास दिली. या युवकाच्या जीव देण्याच्या प्रयत्नामुळे फलटण तहसील कार्यालयात बघ्याची गर्दी झालेली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com