ajit pawar news
ajit pawar news saam tv

Wet Drought : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांची सरकारकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
Published on

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातलं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता राज्यात ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली होती.

ajit pawar news
पराग अग्रवाल Twitterमधून बाहेर पडताच होणार मालामाल, इलॉन मस्क यांना द्यावी लागणार एवढी मोठी रक्कम

दिवाळी साजरी करत असताना वेदना होत होत्या. कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. अनेक शेतकरी टोकाचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी दिवाळी आधीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं.   (Latest News Update)

ajit pawar news
Maharashtra Politics : 'उद्योगधंद्यांपाठोपाठ मुंबईही गुजरातला देऊन टाकतील'

मात्र खरीबाचं पिक गेलं त्यांनतर रबीचं पिक गेल्याने शेतकरी पुरता भरडला गेला आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. सोयाबिय, कापूस अशी पिकं उद्ध्वस्त झाली आहे. शेतीच्या नुकसानीचे अद्याच पंचनामे झाले नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com