हिंजवडीतील अंगणवाडीत २० मुलांना बाहेरून कुलूप लावून ठेवले
सेविका व मदतनीस पंचायत बैठकीला गेल्या असल्याचा खुलासा
पालकांनी संताप व्यक्त केला
बालविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी
गोपाळ मोटघरे, पुणे
पुण्यातील प्रसिद्ध आयटी क्षेत्र असलेल्या हिंजवडीत एका आंगण वाडी सेविका आणि मदतनीसांनी २० लहान मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सेविका आणि मदतनीसांनी "ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावला" असा खुलासा केला आहे. या घटनेनंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान पुण्यातील हिंजवडी येथील क्रमांक तीनच्या अंगणवाडीतील शिक्षिका ग्रामपंचायतीत मिटिंगसाठी गेल्या. मात्र मीटिंगला जाताना अंगणवाडीत शिकत असलेल्या २० मुलांना त्यांनी ओलीस ठेवून बाहेरून कुलूप लावलं. बराच वेळ शिक्षिका परत आल्याचं नाहीत म्हणून अंगणवाडीतील मुलांनी गोंधळ घातला.
या घटनेचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असून याबाबत पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. त्यावर या अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी सांगितले की, "ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगणवाडीला कुलूप लावल." सेविकांचं उत्तर ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन हादरली.
उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना सांगितली. गिराम यांनी तातडीने शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. लहान मुलांना अशाप्रकारे अंगणवाडीत कोंडून जाणं हे धोकादायक ठरु शकत. या घटनेने मात्र पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.