

Andheri By-Election Rutuja Latke : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेने शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसं पत्र सुद्धा लटके यांना महापालिकेकडून (BMC) देण्यात आलं आहे. हे पत्र घेण्यासाठी ऋतुजा लटके या स्वत: महापालिकेत आल्या होत्या. आता त्या पत्र घेऊन दुपारी निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. (Rutuja Latke News Today)
महापालिकेने दिलेल्या पत्रात काय आहे?
मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं पत्र त्यांना दिलंय. ऋतुजा यांचा राजीनामा जरी आज मंजूर केला असला, तरी महापालिकेने दिलेल्या पत्रात १३ ऑक्टोबर रोजी राजीनामा स्वीकारल्याची तारीख नमूद करण्यात आली आहे. म्हणजे कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेने तात्काळ लटके यांचा राजीनामा मंजूर केल्याचं स्पष्ट दिसत आहे.
ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. (Latest Marathi News)
त्यानंतर निवडणूक आयोगाने या जागेवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनीही निवडणुकीत उतरण्यासाठी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला.
मात्र, महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या प्रकरणावरून महापालिकेला चांगलंच खडसावलं. एखादा कर्मचारी निवडणूक लढत असेल तर राजीनामा स्वीकारण्यात अडचण काय? राजीनामा स्वीकारणार आहात की नाही?, असा सवाल कोर्टाने केला. (Maharashtra News)
गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना उद्या सकाळी म्हणजे १४ ऑक्टोबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा, असे आदेशच महापालिकेला दिले. त्यानुसार लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके या आज दुपारी निवडणूक अर्ज भरणार असून अंधेरी पोटनिवडणुकीत त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होईल.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.