Andheri By-election : काँग्रेसमध्ये मतभेद? अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
Shivsena-Congress
Shivsena-CongressSaam Tv
Published On

मुंबई : शिवसेनीतील फूटीनंतर अंधेरी (Andheri) विधानसभेची पोटनिवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडत आहे. राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही निवडणूक (Election) प्रतिष्ठेची बनली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे.

Shivsena-Congress
Shivsena: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच दावा! निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

शिवसेनेला ही जागा सोडण्याऐवजी काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार उभा करायला हवा, अशी भूमिका काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी घेतली आहे. अंधेरी पोटनिवडणूक शिवसेनेप्रमाणे आपल्यासाठीही महत्त्वाची आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेससाठी हिताची ठरणार नाही, असं देवरा यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

मात्र मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा फटका शिवसेनेला बसू शकतो का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मात्र काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Shivsena-Congress
5G Network Fraud: 5G सेवा सुरु करायला जाल, बँक खातं होईल रिकामं; 'ही' चूक अजिबात करु नका, पाहा Video

निवडणूक आयोगाकडून अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधननंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणार मतदान पार पडणार आहे तर 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

मुंबईतील मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं होतं. कुटुंबीयांसोबत दुबईत फिरण्यासाठी गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. 11 मे 2022 संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com