Shivsena: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच दावा! निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे, त्यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आला आहे.
uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shinde saam tv
Published On

शिवाजी काळे, मुंबई

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) पक्षाध्यक्षपदावरुन आता मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेच्या पक्षाध्यक्षपदावर दावा केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे, त्यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रात 40 आमदार आणि 12 खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्य पाठीशी असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना कुणाची याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Shivsena Latest News)

uddhav thackeray and eknath shinde
5G Network Fraud: 5G सेवा सुरु करायला जाल, बँक खातं होईल रिकामं; 'ही' चूक अजिबात करु नका, पाहा Video

सुरुवातीला शिंदे गटाने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलिपी देण्याचे आदेश दिले. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे जोपर्यंत कागदपत्र मिळत नाहीत तोपर्यंत उत्तर कसे देणार? असा ठाकरे गटाचा सवाल आहे.

uddhav thackeray and eknath shinde
'आदिपुरुष'वरुन मनसे-भाजप आमने-सामने; घाणेरड्या राजकारणासाठी एखाद्या दिग्दर्शकाला त्रास नको, अमेय खोपकर संतापले

दरम्यान शिवसेनेचा ठाकरे गट आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी काही कालावधी निवडणूक कार्यालयाकडून मागून घेणार आहे. सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र तयार असून ती दिल्लीत पोहच झालेली आहेत. परंतु आणखी ५० हजार प्रतिज्ञापत्रे मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेना आणखी कालावधी मागून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची प्रतिज्ञापत्रे आजच निवडणूक आयोगाला दिली जाणार आहेत. या कार्यकारणीमध्ये शिवसेना नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार, विभागप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचा समावेश आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com