'आदिपुरुष'वरुन मनसे-भाजप आमने-सामने; घाणेरड्या राजकारणासाठी एखाद्या दिग्दर्शकाला त्रास नको, अमेय खोपकर संतापले

केवळ 95 सेकंदांचा टीझर पाहून टीका होते हे चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत
MNS-BJP
MNS-BJPSaam TV
Published On

>> रुपाली बडवे

मुंबई : आदिपुरुष सिनेमावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि भाजप आमने-सामने आली आहे. भाजपने 'आदिपुरुष' सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar)यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही कोणी सिनेमा बघितला का? अशी विचारणा अमेय खोपकर यांनी केली आहे.

MNS-BJP
Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर सुस्साट प्रवास! कोणती गाडी किती वेगाने धावणार? शासनाकडून वेगमर्यादा निश्चित

दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. केवळ 95 सेकंदांचा टीझर पाहून टीका होते हे चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल, असंही अमेय खोपकर यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

चित्रपट आधी येऊ द्या. पुढच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून पौराणिक गोष्टी तरी कळतील. नव्या पिढीला वेगळ्या पद्धतीनं रामायण बघू द्यावं. तुम्ही गेला होतात का रावण कसा होता ते बघायला? अशी विचारणा अमेय खोपकर यांनी केली आहे.

MNS-BJP
Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार? दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता

राम कदमांना सिनेमा कळत असेल तर त्यांनी चित्रपट बनवावा. चित्रपट बघून विरोध करा. एखादा चित्रपट बनवताना मोठी मेहनत लागते. राम कदम यांची ही वैयक्तिक भूमिका असावी, जर भाजपची किंवा इतरांची ही भूमिका असेल तर आम्ही म्हणजे मनसे त्यांच्या पाठिशी उभे राहू, असंही अमेय खोपकर यांनी सांगितलं.

मी हा सिनेमा नक्की बघणार आहे. ओम राऊत यांनी तान्हाजी, लोकमान्य सिनेमा बनवलाय, तो कट्टर हिंदुत्ववादी आहे, तो असं काही करणार नाही. त्याच्या क्रिएटिव्हिटीमध्ये जाऊ नका, त्याला काम करु द्या. तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी एखाद्या दिग्दर्शकाला त्रास देऊ नका. सरकारनं अशा गोष्टींना पाठिशी घालू नये. एखाद्या चित्रपटाला जातीचा आणि धर्माच्या ॲंगलने बघू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com