Ambernath bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचा बसचा अपघात; सुदैवाने विद्यार्थी प्रवासी सुखरूप

Ambernath bus Accident News : अंबरनाथमधून अपघाताचं मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली खासगी शाळेची बस आणि टँकरची अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Ambernath bus Accident
Ambernath bus Accident Saam tv

Ambernath bus Accident News :

अंबरनाथमधून अपघाताचं मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली खासगी शाळेची बस आणि टँकरची अपघात झाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या बस चालकाचं बसवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर टँकर चालकाने कट मारल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

अपघात नेमका कुठे झाला?

अंबरनाथ पश्चिम येथे फादर अँगल शाळेच्या मुलांना घेऊन उल्हासनगर निघालेल्या बसचा अपघात झाला. विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा साईबाबा मंदिर येथे येताना एका टँकर चालकाने कट मारला. त्यानंतर बस चालकाचा बसवरुन नियंत्रण सुटलं. त्यानंतर शाळेची बस ही दुभाजकाला जाऊन धडकली. अपघातानंतर घाबरलेल्या मुलांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढलं.

Ambernath bus Accident
Ambernath Accident News | ट्रक चालकाची एक चूक मायलेकीला पडली महागात, घटना सीसीटीव्हीत कैद | Marathi

सुदैवाने या अपघातात कुठलीही दुर्घटना झालेली नाही. या अपघातात सर्व विद्यार्थी सुखरुप बाहेर काढण्यात आले. या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. या चालकाला उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

Ambernath bus Accident
Washim Accident News : सावंगी फाटानजीक कार ऑटोचा अपघात, चार प्रवासी जखमी

अकोल्यात भर रस्त्यात कारनं घेतला अचानक पेट

अकोल्यातील भर रस्त्यात कारने अचानक पेट घेतला. अकोला शहरातील फतेह चौक परिसरातील ही घटना घडली. आज शनिवारी दुपारच्या सुमारास कारमधून अचानक धूर निघायला लागला. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला.

नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळात या कारची आग वाढली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. कारच्या इंजिनमध्ये स्पार्क झाल्याने आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com