मनसेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राजकारण सुरु असताना, आता अंबरनाथमधील एका कंपनीतील विविध पदाच्या नोकरीसाठी गुजरातमध्ये मुलाखत होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या या निर्णयावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री शिंदे यांना टॅग करत लक्ष देण्याची विनंती केली आहे. (Latest Marathi News)
अंबरनाथ येथील सेंटॉर फार्मा कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरभरती सुरु आहे. थेट मुलाखतीद्वारे नोकरी भरती सुरु आहे. अंबरनाथ स्थित सेंटॉर फार्मा कंपनीतील नोकरीसाठी गुजरातच्या अंकलेश्वर येथे थेट मुलाखतीद्वारे नोकरभरती सुरु आहे. कंपनीच्या गुजरातमध्ये मुलाखत घेण्याच्या निर्णयावरून मनसे नेते मनोज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत हा प्रकार समोर आणला आहे. मनोज चव्हाण यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'मुख्यमंत्री साहेब हे खपवून घ्यायचं का? कंपनी महाराष्ट्रातील अंबरनाथला आहे. पण यासाठी मुलाखती गुजरातला. हे खपवून घेणार नाही, वेळीच आवरा, या प्रवृत्तीला,अन्यथा मनसे सोडणार नाही'.
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी पोस्ट करत कंपनीचा प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्या नजरेसमोर आणला आहे. मनोज चव्हाण यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनोज चव्हाण यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.