Alibag News: अलिबागच्या खांदेरी किल्ल्याजवळ भाविकांची बोट समुद्रात कलंडली

Boat Capsized Near Alibag Khanderi Fort: अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्यावर गेलेल्या भाविकांची बोट समुद्रात कलंडली. सुदैवाने बोटीवरील 10 ते 12 जण सुखरूप बचावले. ही घटना 31 मार्च म्हणजे रविवारची आहे. बोट कलंडतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
Alibag Sea
Alibag SeaSaam Digital

Alibag News

अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्यावर गेलेल्या भाविकांची बोट समुद्रात कलंडली. सुदैवाने बोटीवरील 10 ते 12 जण सुखरूप बचावले. ही घटना 31 मार्च म्हणजे रविवारची आहे. बोट कलंडतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. हे सर्वजण खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना किल्ल्याजवळच बोट पाण्याच्या माऱ्याने कलंडली आणि बोटीवरील सर्वजण पाण्यात कोसळले. सुदैवाने हे सर्वजण पट्टीचे पोहणारे असल्याने सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आणि मोठा अनर्थ टळला.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

मुक्ताई नगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि आमदार चंद्रकांत पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Alibag Sea
Pune: सिंहगड, कासुर्डे, शिरगावसह अंबीमध्ये दारु अड्ड्यांवर छापे,१ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गाडीचा आज किरकोळ अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये फिरत असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील दोन गाड्यांची धडक होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पोलीस व्हॅनसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

Alibag Sea
Baramati Lok Sabha Constituency : 7 दिवसांत पाणी द्या, अन्यथा मतदान विसरा; जेजुरी ग्रामस्थांचा बहिष्काराचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com