Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

ajit pawar on ladki bahin yojana Scam : लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहारावर अजित पवारांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी १४ हजार पुरुषांवर कारवाई करणार असल्याचाही इशारा दिला.
ajit pawar Latest news
ajit pawar NewsSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेत १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित १४ हजार पुरुषांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यात अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव आणि पुरस्कार सोहळा पार पडलाय.

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : लाडकी बहीण योजनेच्या लाभावर १४ हजार पुरुषांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या १४ हजार पुरुषांवर कारवाई करणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात आज शनिवारी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभ साजरा होत आहे. पुण्यातील हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहारांवर भाष्य केलं.

ajit pawar Latest news
Tragic Accident : मुसळधार पावसाचा फटका, शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना,६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अजित पवार म्हणाले, 'या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले आहेत. चांगल्या भावनांनी ही योजना तयार केली होती. या योजनेत पुरुष लोकांचे नाव येण्याचे कारण नाही. जर आले असतील, तर ही योजना पुरुषांची नाही. ती दुरुस्ती करताना नावे चुकले असतील. जर पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील'.

ajit pawar Latest news
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबतही अजित पवारांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'धनंजय मुंडे यांना क्लिनचीट मिळाली आहे, इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयात जे काय चौकशीचा अहवाल आला नाही. ते सर्व होऊ द्या, हे सगळे अहवाल सकारात्मक आले, तर त्याबद्दलचा विचार करू असं मी म्हटलं'.

ajit pawar Latest news
Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

'माझं काम करताना वेगळा स्वार्थ नसतो. मी प्रामाणिकपणे काम करत आहे,असंही त्यांनी सांगितलं. 'माणिकराव कोकाटेंबाबत मी आधीही बोललो आहे. मी कोकाटेंसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com