Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam tv

Ajit Pawar News: पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार घडला? गोपीचंद पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया

Ajit Pawar News: चार वर्षांपूर्वी मंचरमधील एका मुलीला फुस लावून पळवून घेऊन नेल्याचा आरोप केला. यात चौकशी करून कारवाई करावी, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

सचिन जाधव

Ajit Pawar News: पुणे जिल्हयातील मंचर येथे लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. चार वर्षांपूर्वी मंचरमधील एका मुलीला फुस लावून पळवून घेऊन नेल्याचा आरोप केला. यात चौकशी करून कारवाई करावी, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

प्रेमविवाह करुन एक अल्पवयीन मुलगी २०१९ पासून फरार होती. या मुलीबद्दल नातेवाईकांना संशय होता की एका मुलासोबत पळून गेली आहे. गोपीचंद पडळकरांनी हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा दावा केला. त्याबद्दल त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मुलीचे आईवडील व काही स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जाऊन त्या मुलीला घरी घेऊन आले.

Ajit Pawar News
Maharashtra Political Crisis: 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रक्रियेला वेग; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय!

या प्रकरणात गोपीचंद पडळकरांनी मुलीवर अत्याचार आल्याचे,जबरदस्तीने बुरखा घालण्यास लावल्याचा, बीफ खावू घातल्याचे, झोपेच्या गोळा घेतल्याचे आरोप केले. त्या अल्पवयीन मुलीला मंचर पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी नेण्यात आलं. मुलीची मानसिक अवस्था अस्थिर असल्याचे दिसून आले. तिचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान आरोपीला अटक केले असून याची सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पडळकर यांनी लव्ह जिहादचा आरोप केला आहे.

या प्रकरणावर अजित पवार म्हणाले, 'अशा प्रकरणात चौकशी करावी, त्यानंतर काय होतं ते कळेल,पण खोलात गेल्यावर वेगळं चित्र समोर येत. त्यामुळे सभागृहात ही बरच काही बोलल जातं, प्रत्यक्षात काहीच नसतं'. तर पीडित मुलीच्या भावालाही हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याच वाटत आहे. तसे अनेक पुरावे पोलिसांना दिले असल्याच म्हटलंय. त्यामुळे पोलिसांनी तपास करून कारवाई करावी, अशी मागणी केली

Ajit Pawar News
Eknath Shinde News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले...

काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की केरला स्टोरी पाहून आपल्याही कुटुंबातील मुलीसोबत अस घडलं असेल असा म्हणून तपास केला असता पीडित मुलगी सापडली. आता या प्रकरणाचा तपास पोलिसानी त्या दृष्टीने सुरू केला आहे. त्यामुळे आता हे खरच लव्ह जिहाद आहे की अजून हे तपासानंतर कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com