Ajit Pawar on UN Population Report: चीनला मागे टाकलं, आता बास झालं; लोकसंख्यावाढीवर अजित पवारांचं भाष्य

जगात सर्वात जास्त लोकसंख्या आता आपल्या देशात झाली आहे. म्हणुन आता अतिशय कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
Ajit PAwar
Ajit PAwarSaam TV
Published On

Ajit Pawar on UN Population Report: संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येची आकडेवारी जारी केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात असल्याची नोंद करण्यात आली आहे. लोकसंख्या वाढीवर अजित पवार  यांनी भाष्य केलं. सकाळ समुहाच्या 'दिलखुलास अजितदादा' या कार्यक्रमात अजित पवार बोलते होते.

जगात सर्वात जास्त लोकसंख्या आता आपल्या देशात झाली आहे. म्हणून आता अतिशय कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. संतती प्राप्ती ही काही देवाची कृपा नव्हे, तर ही नवरा बायकोची कृपा असते, हे कृपया आपण सर्वांनी आता तरी मान्य करायला हवं, असं अजित पवारांनी म्हटलं. (Breaking Marathi News)

Ajit PAwar
Ajit Pawar Exclusive Interview: 'शिंदे गटाच्या आमदारांना सूरत गाठण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत'; उद्धव ठाकरेंना कसं फसवलं?

लेकची बापाचं नाव काढते

आता जगात पहिले आलो आहोत, आता बस झालं. जगात सर्वात लोकसंख्या असलेला नावलौकिक आपला झाला आहे. किती आपत्य जन्माला घालावी ही परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते, नवरा-बायकोची कृपा असते, असं अजित पवारांनी म्हटलं.

मुलासोबत मुलीलाही तेवढात मान दिला पाहिजे. लेकची बापाचं नाव काढते. पोरगं बापाचं नाव घालवतो, अशी अनेक उदाहरणं राज्यात पाहायला मिळतील, असंही अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

Ajit PAwar
Ajit Pawar Exclusive Interview: नरेंद्र मोदींनंतर कोण? अजित पवारांनी थेट अन् सविस्तर सांगितलं...

पुढच्या पीढीचा विचार करायला हवा

लोकसंख्या वाढीमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना रोज सामोरं जावं लागतं. जगातील सर्वात तरुणांची संख्या असलेला देश आपण आहोत. मात्र भविष्याचा विचार केला पाहिजे. पुढच्या पीढीचं नुकसान होणार नाही यांचं चिंतन केलं पाहिजे आणि कठोर निर्णय याबाबत घेतले पाहिजे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com