Ajit Pawar Exclusive Interview: नरेंद्र मोदींनंतर कोण? अजित पवारांनी थेट अन् सविस्तर सांगितलं...

Ajit Pawar Exclusive Interview: 1984 नंतर 2014 मध्ये पूर्ण बहूमत असलेलं सरकार देशात आलं, हा नरेंद्र मोदींचा करिष्मा होता.
Ajit Pawar - PM Modi
Ajit Pawar - PM ModiSaam TV
Published On

Ajit Pawar Exclusive Interview: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. भाजप 2014 आणि 2019 पर्यंत सर्वदूर पोहोचला याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत. त्यांचा करिष्मा देशभर चालला, अजित पवार यांनी म्हटलं. दिलखुलास अजितदादा या सकाळ समूहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतातील जनतेला वाटलं त्यांच्या हाती आता सत्ता द्यावी, म्हणून हे शक्य झालं. 1984 नंतर 2014 मध्ये पहिल्यांदा पूर्ण बहूमत असलेलं सरकार देशात आलं, हा नरेंद्र मोदींचा करिष्मा होता. मात्र त्यांच्यानंतर कोण असा विचार केला तर कुठलंही नाव आतातरी दिसून येत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Ajit Pawar - PM Modi
Ajit Pawar Exclusive Interview: 'शिंदे गटाच्या आमदारांना सूरत गाठण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत'; उद्धव ठाकरेंना कसं फसवलं?

भाजपच्या यशाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, भाजपला आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा, भारतीय किसान संघ, विश्वहिंदू परिषद अशा अनेक संघटनांची मदत होते. असं कोणत्याच राजकीय पक्षात होत नाही. मात्र कितीही ताकद असली तरी एकदा भारताच्या जनतेने ठरवलं तर तेच होतं.  (Latest Marathi News)

उद्याच्या काळात भारतात आणखी एखादा नेता उदयाला येऊ शकतो. जो देशातील जनतेचा विश्वास संपादित करु शकतो. एखादा असा मुद्दा येईल की जो लोकांच्या मनात येई आणि रुजेल, असंही अजित पवार म्हणाले.  (Breaking Marathi News)

Ajit Pawar - PM Modi
Ajit Pawar Exclusive Interview : ...तर आर.आर पाटील मुख्यमंत्री झाले असते; अजित पवार काय म्हणाले, वाचा...

एकत्र लढणे काळाची गरज - अजित पवार

विरोधकांच्या मतांची विभागणी झाली तर सत्ताधारी पक्षाला फायदा होईल. त्यामुळे एकत्र लढण्याची भूमिका विरोधकांनी ठेवली पाहिजे, ज्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे लोकप्रिय उमेदवार आणि मतांची विभागणी झाली तर निकाल फिरतो हे कसब्याच्या निवडणुकीत दिसलं. त्यामुळे एकत्र लढणे काळाची गरज आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com