Ajit Pawar Latest Speech: "२००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र, दिल्लीतून निरोप आला, की आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार", असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार का?, अजित पवार भाजपसोबत जाणार का?, राजकीय भूकंप होणार का?, या सगळ्या प्रश्नांवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. (Breaking Marathi News)
काय म्हणाले अजित पवार?
"२००४ मध्ये राष्ट्रवादीला विधानसभेत ७१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी मानसिकता केली होती की, राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद जाईल, पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. निरोप आला की आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार", असं अजित पवार यांनी (Ajit Pawar) सांगितलं.
"त्यानंतर आम्ही बहुमाताने विधिमंडळाचे नेते म्हणून आर.आर. पाटील यांची निवड केली होती. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आलं असतं, आम्ही ते घेतलं असतं तर राष्ट्रवादीचा नेता म्हणून २००४ साली आर.आर. पाटील मुख्यमंत्री झालेलं आपण सर्वांनी पाहिलं असतं", असंही अजित पवार म्हणाले.
'...त्यामुळेच आम्हाला उपमुख्यमंत्रिपद मिळतं'
पुढे बोलताना पवार म्हणाले, शेवटी प्रयत्न करणं आपलं काम असतं आणि जनतेचा कौल देणं हे मतदारांचं काम असतं. पण त्यानंतर प्रत्येकवेळी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, काँग्रेसच्या जास्त जागा आल्या त्यामुळं उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडं येत गेलं, अशी घटना यावेळी अजितदादांनी कथन केली.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.