Pune : शिंदे सेनेच्या 'मिशन टायगर'ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ब्रेक? पुण्यात नेमकं काय घडतेय?

Pune Shiv Sen vs NCP News Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मविआच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
Pune Shiv Sen vs NCP News Update
Pune Shiv Sen vs NCP News Update
Published On

अक्षय बडवे, पुणे

Shinde's Sena Faces NCP Resistance Over Mission Tiger : एकनाथ शिंदे यांच्या मिशन टायगरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मविआच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीमध्येच चढाओढ सुरू असल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्याला आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गळ घातला जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पुण्यात तिढा निर्माण होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेच्या "मिशन पुणे" ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तगडे आव्हान मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि काँग्रेसचे माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी कांग्रेसकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीतच महाविकास आघाडीतील नेत्यांना घेण्यावरून रस्सीखेंच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Pune Shiv Sen vs NCP News Update
Pune Crime : ८ जणांनी कोयता अन् तलवारीने सपासप वार केले, तरूणाचे हात-पाय तोडले, मध्यरा‍त्री कोथरूडमध्ये थरार

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अनेकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुण्यातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) मधील अनेक जणं एकनाथ शिंदेंच्या सोबतीला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Pune Shiv Sen vs NCP News Update
Pune : पुण्यात काँग्रेसला भगदाड पडणार? हुकमी शिलेदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची खुली ऑफर

मात्र आता यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सर्वांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सोमवारी अजित पवार यांच्या पक्षाच्या रुपाली पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर याना पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महादेव बाबर यांना त्यांच्या पक्षात येण्याची विनंती केल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com