Ajit Pawar : फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही; सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit pawar on seat sharing : महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. सातारा आणि नाशिक या दोन प्रमुख जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. या दोन्ही जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे.
Ajit Pawar : फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही; सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवारांचं महत्वाचं विधान
Ajit pawar newsSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे

Ajit pawar News:

महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. सातारा आणि नाशिक या दोन प्रमुख जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. या दोन्ही जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे. तर शिंदे गटातील हेमंत गोडसे देखील इच्छुक आहेत. तर साताऱ्यात उदयनराजे भोसले हे भाजपच्या तिकीटावरून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. या दोन्ही जागेवरून अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवर मोठं वक्तव्य केलं.

'सातारा आणि नाशिकबाबत सगळ व्यवस्थित होईल. काळजी करू नका. ती निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे. त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झालेली नाही. नाशिक किंवा कोकण यांच्यातील फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील पाचवा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे. देशातील सातवा टप्पा शेवटचा आहे. त्यामुळे त्याला अजून विलंब आहे. आम्ही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करू. त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील असतील. मी मुंबईमध्ये आहे. त्यांच्या संदर्भात बसू आणि योग्य मार्ग काढू'

Ajit Pawar : फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही; सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवारांचं महत्वाचं विधान
Maharashtra Election: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढली; सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी अजित पवार म्हणाले, 'पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत. त्या विदर्भातील आहेत. विशेष म्हणजे भंडारा, गोंदिया, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागातील आणि त्याच्यावर त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली. दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात सभा आहे आणि त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे'.

Ajit Pawar : फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही; सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवारांचं महत्वाचं विधान
Delhi Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक; केजरीवाल कोठडीत असताना होणार निवडणूक

यावेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही अजित पवारांनी भाष्य केलं. ' गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिलं आहे. त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. महायुतीला याचा नक्कीच फायदा होईल. राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com