(गिरीश कांबळे, मुंबई )
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. मागील झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील मतदान केंद्रे ९५ हजार ४७३ होती. आता राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या मतदान केंद्रांमध्ये सर्वाधिक केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात मतदान केंद्राची संख्या ८ हजार ३८१ आहे. तर सर्वात कमी केंद्र सिंधूदुर्ग जिल्ह्यात असून त्याची संख्या ९१८ आहे.(Latest News)
राज्यात सर्वात जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. ही संख्या ८ हजार ३८१ आहे. यानंतर मु्ंबई उपनगर येथे ८ हजार ३८९ मतदानर केंद्र असणार आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ५९२ , नाशिकमध्ये ४ हजार ८०० आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ४ हजार ५१० मतदान केंद्रे असतील. सर्वात कमी मतदान केंद्रे गडचिरोली आणि सिंधुदूर्गमध्ये आहेत. सिंधुदूर्गमध्ये ९१८ आणि गडचिरोलीमध्ये ९५० मतदान केंद्रे असणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये ३ हजार पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत. यात अहमदनगरमध्ये ३ हजार ७३४ सोलापूरमध्ये ३ हजार ६१७, जळगावमध्ये ३ हजार ५८२ कोल्हापूरमध्ये ३ हजार ३६८, औरंगाबादमध्ये ३ हजार ८५, नांदेडमध्ये ३ हजार ४७ आणि साताऱ्यात ३ हजार २५ मतदान केंद्र असणार आहेत.
दोन हजार पेक्षा अधिक मतदान केंद्र कुठे आहेत
राज्यातील १० जिल्ह्यामध्ये २ हजारहून अधिक मतदान केंद्र आहेत. यात रायगडमध्ये- २ हजार ७१९, अमरावतीमध्ये २ हजार ६७२, यवतमाळमध्ये २ हजार ५३२, मुंबई शहरामध्ये २ हजार ५१७, सांगलीमध्ये २ हजार ४४८, बीडमध्ये २ हजार ३५५, बुलढाण्यामध्ये २ हजार २६६, पालघरमध्ये २ हजार २६३, लातूरमध्ये २ हजार १०२ आणि चंद्रपूरमध्ये २ हजार ४४ मतदान केंद्रे असणार आहेत.
दरम्यान राज्यात २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी ६४ हाजर ५०८ मतदान केंद्रे होती. तर २००९ मध्ये ८३ हजार ९८६ मतदान केंद्रे होती. २०१९ च्या निवडणुकीच्यावेळी ही संख्या वाढवण्यात आली. २०१९ च्या निवडणुकीवेळी ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे होती. यंदाच्या निवडणुकीसाठी या मतदान केंद्रांची संख्या ९८ हजार करण्यात आलीय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५० मतदान केंद्रे संवेदनशील
औरंगाबाद आणि जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संभाव्य उमेदवारांसह सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केलीय. तर दुसरीकडे पोलीस विभागाने देखील आता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पुढील २ महिने २४ तास ३ हजार १८० पोलीस अलर्ट मोडर राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये अलर्ट सांगितल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. त्यामुळे पोलिसांसह अन्य तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.