Ajit Pawar: हे जीएसटी भवन मुंबईकरांची नवी ओळख होईल - अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन म्हणजेच जीएसटी भवन याचे भूमिपूजन पार पडले.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: जे-जे डिपार्टमेंट महसूल देतात, तिथे प्रत्येक ठिकाणी सुविधा असल्याच पाहिजेत. हे जीएसटी भवन मुबईकरांची नवी ओळख होईल. इथे यायला सर्व ठिकाणाहून सोयीचे पडेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन म्हणजेच जीएसटी भवन याचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालक मंत्री आश्रम शेख, मंत्री एकनाथ शिंदे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Ajit Pawar
दोन वर्षानंतर तुळजापुरात भाविकांच्या उपस्थितीत उभारली गुढी

राज्यशासनच्या नवीन जीएसटी (GST) भवनचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यांचे धन्यवाद. आजचा गुढी पाडवा कोरोना मुक्तीची नवी पहाट घेऊन आला आहे. मुख्यमंत्री यांनी सर्व निर्बंध हटवले त्यासाठी आभार मानतो.

साधारण 2014 पूर्वीच असं भवन सुरु करावे, अशी इच्छा होती पण काही ना काही अडचणी आल्या. मात्र, आज याचे भूमिपूजन होत आहे. ज्या इमारती होत्या त्या ब्रिटिशांच्या काळात झाल्या. ईस्टर्न फ्री वे असेल, तसेच शिवडीला प्रकल्प यांनी दळणवळणची सुविधा वाढली आहे, वाढणार आहे. साधारण यात 1800 कोटी रुपयांची ही इमारत असेल, ग्रीन बिल्डिंग असेल. यात जसा निधी लागेल तसा तो दिला जाईल. वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे. जे टॅक्स मिळवून देणारी डिपार्टमेंट आहेत तिथे सर्व सुविधा असल्या पाहिजेत, अशी माहिती त्यांनी दिली.

जनतेला चांगली सेवा देता आली. आम्ही कोरोनाविरुद्ध यशस्वी काम केलं, त्याचा सुद्धा उल्लेख करतो. पुन्हा असं संकट आले नाही पाहिजे, अशी काळजी घेतली पाहिजे. यंदाचा अर्थसंकल्प आपण 1 कोटी ट्रिलियन वर नेऊन ठेवायचा आहे. आपण ते उद्दिष्ट पूर्ण करुया. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक सुद्धा रुपायाची कर वाढ आपण केली नाही. एक एप्रिलपासून नैसर्गिक वायूंचा कर आपण कमी केला. त्यामुळे पाईपलाईनने गॅस पुरवठा होणाऱ्या लाखो घरांमध्ये फायदा होणार आहे.

जे-जे डिपार्टमेंट महसूल देतात तिथे प्रत्येक ठिकाणी सुविधा असल्याच पाहिजेत. हे जीएसटी भवन मुबईकरांची नवी ओळख होईल. इथे यायला सर्व ठिकाणाहून सोयीचे पडेल.

मुख्यमंत्री महोदय हे बरं नाही, की आमच्याकडे हे खाते आहे आणि तुम्ही इथे स्वतः उपस्थित नाही राहिलात आणि मराठी भाषा भवन ला स्वतः उपस्थित राहणार, असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांना कोपरखळी लगावली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com